Saturday, August 8, 2009

दमलेल्या बापाची ही कहाणी

(सलीलचा आवाज) पद्य:
......
कोमेजून निजलेली एक परी राणी
उतरले तोंड,डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
.....................................................................
आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा तरी लोकलची वारी
रोज सकाळीच राजा निघताना बोले
गोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परि येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ खेळी
खर्‍याखुर्‍या परीसाठी गोष्टीतली परी
मांडीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
.....................................................................
(संदीपचा आवाज) गद्य:
ऑफिसात उशीरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे
आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे
तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी
.....................................................................
(सलीलचा आवाज) पद्य:
उधळत खिदळत बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हसूनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई
तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
.....................................................................
(संदीपचा आवाज) गद्य:
दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ-मऊ दूध भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी
.....................................................................
(सलीलचा आवाज) पद्य:
कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुला
आईपरी वेणी फणी करतो ना तुला
तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा
तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची या कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
.....................................................................
(संदीपचा आवाज) गद्य:
बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्‍त,जवळ पहायचंच राहिलं
.....................................................................
(सलीलचा आवाज) पद्य:
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो
बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
.....................................................................
--- संदीप खरे.
.....................................................................

Thursday, August 28, 2008

गणपति बाप्पा !!! अहो मला भेटला

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
दोन क्षण दम खातो म्हणून माझ्याघरी टेकला

बाप्पा : उंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही सापडला

मी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्याला

मी : तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस ?
मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोस
मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक
बाप्पा : इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
भक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतो
काय करू आता सार मॅनेज होत नाही
पुर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाहीत
इमिग्रेशन च्या रिक्वस्ट्स ने सिस्टीम झालीये हॅंग
तरीदेखील संपतच नाही भक्तांची रांग
चार आठ आणे मोदक देऊन काय काय मागतात
माझ्याकडच्या फ़ाइल्स नुसत्या वाढतच जातात

मी : माझं ऐक तू कर थोडं थोडं डेलिगेशन
मॅनेजमेंटच्या थेअरीमधे मिळेल सोल्यूशन
एम बी ए चे फ़ंडे तू शिकला नाहीस का रे ?
डेलिगेशन ऑफ़ ऍथॉरिटी ऐकल नाहीस कारे ?
असं कर बाप्पा एक लॅपटॉप घेउन टाक
तुझ्या साऱ्या दूतांना कनेक्टीव्हिटी देऊन टाक
म्हणजे बसल्याजागी काम होइल धावपळ नको
परत येउन मला दमलो म्हणायला नको

माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा झाला खुश
माग म्हणाला हवं ते एक वर देतो बक्षिस
सी ई ओ ची पोझिशन, टाऊनहाऊस ची ओनरशिप
ईमिग्रेशनदेखील होइल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप

मी : मी हसलो उगाच, म्हंटल, देशील जे मला हवं
म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं
'पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं '
'सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं'
'हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव'
'प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव '
'देशील आणून परत माझी हरवलेली नाती '
'नेशील मला परत जिथे आहे माझी माती '
'इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं '
'आईबापाचं कधीही न फ़िटणारं देणं '
'कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर '
'भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार '
'य़ंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान'
देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान ?

"तथास्तु" म्हणाला नाही सोंडेमागून नुसता हसला

बाप्पा : सारं हाताबाहेर गेलंय पोरा "सुखी रहा" म्हणाला

Monday, August 18, 2008

माज्या बापाला रडतांना पाहिलय....!!

एक सर्वसाधारण माणसाची सत्य कथा .... दिनांक डिसेम्बर ०६

माज़या बापाला रडतांना पाहिलय....
"बाप"
शांत चेहरा, ना शब्द काही,डोळ्यात प्रेम साठलेले,
तो मजसंगे नेहमी डोळ्यांनीच बोलत राहिला।

मी नेहमी त्याला कठोर समजायचो,
दुखी झालो की आईच्या कुशीत लपायचो,
तो मात्र मज़ साठी स्वतःचे रक्त विकत राहिला।
स्वतःच्याच हातून ,मी त्याच्या,स्वप्णाना तुटतांना पाहिलय,
होय, मी आज...माज़या बापाला रडतांना पाहिलय.

आई,मला सायकल हवी,आई म्हणायची बेटा पैसे नाही,
दुसर्या दिवशी माज़या हातात चावी असायची.
मी आई ला बीलगायचो,आई ही मला कुर्वळायची,
पण तिच्या डोळ्यात खिनता असायची,
कारणत्या सायकलमागे,
त्याने त्याची भाकरी सुधा त्यागलेली असायची.
मला हसतांना पाहून ,उपाशी पोटाने ,
मी त्याला शांत हसतांना पाहिलय,
होय ,मी आज... माज़या बापाला रडतांना पाहिलय.

मोठा झालो खर्च वाढला,
मी ही बाकींच्या सारखा मज्जा करायचो,
सिनिमा पहायचो,मुलीसोबत फीरायचो,
पैसे कमी पडलेच तर आईला मागायचो.
तो थरथरणार्‍या हातानी राब राब राबायचा,
मळलेला कुर्ता फाटलेले धोतर,
पण कधीच मला काही कमी ना पडू द्यायचा.

त्याच्या निघणार्‍या प्रत्येक घामाच्या थेंबात,
माझाच विचार आणि माझेच सुख पाहिलय,
होय, मी आज... माज़या बापाला रडतांना पाहिलय.

तो जळत राहिला वात बनून,
माज्या जीवनातला अंधार दूर करण्यासाठी,
मी मात्र त्याचे अंग नि अंग नोचले,
स्वतःचे शॉक पाणी पूर्ण करण्यासाठी,
चुक कळली मला,त्याच्या स्वप्णाना पूर्ण करावसं वाटतय,
त्याच्या पायावर डोके ठेवून रडावसं वाटतय.पण,

तरीही....माज़या प्रत्येक संकटात,
मी त्याला माझा विश्वास बनून उभा राहतांना पाहिलयहोय,
मी आज...माज़या बापाला रडतांना पाहिलय.